maxresdefault

गँगमनची सतर्कता,मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात टळला

महाराष्ट्र

दोन रुळामध्ये पडलेले अंतर एका सतर्क गॅंगमनच्या वेळीच लक्षात आल्यामुळे मुंबईहुन पुण्याकडे येणाऱ्या इंटरसिटी गाडीचा अपघात टळला. हा प्रकार ठाकूरवाडी ते मंकी हिलच्या दरम्यान घडला.
मुंबई-पुणे मार्गावर रोज धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसचा अपघात आज थोडक्यात टळला. रेल्वे नेहमीप्रमाणे या मार्गावरुन जात असताना रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. हा प्रकार ठाकूरवाडी ते मंकी हिलच्या दरम्यान घडला होता. या ठिकाणी दोन रुळाच्या मध्ये सुमारे तीन ते चार इंचाचे अंतर पडले होते. यावरुन रेल्वे गेली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या प्रकारामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दोन एक्सप्रेस उशीराने धावत आहेत. इंटरसिटी एक्सप्रेस १ तास उशीराने तर डेक्कन एक्सप्रेस १५ मिनिटे उशीराने धावत आहे.
आज सकाळी इंटरसिटी एक्सप्रेस खंडाळा घाटातून जात असताना गॅप पेट्रोलिंग करून घरी जाणाऱ्या गँगमन सुनील कुमार यांना डाऊन लाईनवरील रेल्वे रुळाला तडे गेल्याचे त्यांना दिसले. तितक्यात मुंबईहून पुण्याला येणारी इंटरसिटी एक्सप्रेस तिथे पोहचली. मात्र सुनील कुमार यांच्या सतर्कतेमुळे ती रेल्वे जागीच थांबवण्यात आली. गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. इंटरसिटी एक्स्प्रेस मुबईहून सकाळी ६.४० वाजता निघते आणि ९.५० ला पुणे स्टेशनला पोहोचते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *