lok-sabha1

१२ वर्षांखालील मुलींवरली बलात्कार प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा, लोकसभेत विधेयक मंजूर

देश

१२ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या चिमुरडींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिफारस करणारं फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर झालं आहे. यामुळे लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांभोवती कायद्याचा फास आवळता येणं शक्य होणार आहे.
लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. यानंतर सध्याच्या फौजदारी गुन्हा कायद्यात दुरुस्ती करण्याचे ठरवण्यात आले होते. दरम्यान लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे.
१६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा २० वर्षांपेक्षा कमी असणार नाही. ही शिक्षा वाढवून आजीवन कारावासापर्यंत होऊ शकते. बलात्कार प्रकरणात दोषी अथवा निर्दोष ठरविलेल्या प्रकरणांचे अपील सहा महिन्यांच्या आत निकाली काढावे लागतील. तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची यात तरतूद आहे. तसेच, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात आता आरोपीला जामीन मिळू शकणार नाही. पीडितेला तपासात होणारा त्रास पाहता अशी तरतूद करण्यात आली आहे की, कोणताही वकील पीडितेच्या चारित्र्याबाबत प्रश्न करणार नाही. असा प्रयत्न राहील की, प्रकरणाची सुनावणी महिला न्यायाधीशांसमोर होईल. अशा प्रकरणात इन कॅमेरा सुनावणी झाल्यासही पीडितेला आधार मिळेल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *