_76f7fcae-8a90-11e7-a194-d8b7abb7611c

लोकलमधून थुंकण्याच्या नादात दोन तरुणांचा मृत्यू

मुंबई

लोकलमधून थुंकण्याच्या नादात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली.सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर सरफराज थुंकण्यासाठी लोकलबाहेर झुकला असता त्याचा तोल गेला आणि खाली पडला. यावेळी अमन दरवाजात उभा होता. सरफराजसोबत त्याचाही तोल गेला. या दुर्घटनेत सरफराज जागीच ठार झाला, तर अमन गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *