Narayan-Rane-2

आंदोलन थांबल्यास सरकार तातडीने विचार करेल : माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे

महाराष्ट्र

राज्यामध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनावर माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीदरम्यान राज्यामध्ये सुरू असलेले आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली असून राज्यातील हिंसाचार बंद व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे. तसेच आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यास सरकार प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, असेही राणेंनी सांगितले. मराठा समाजाचे नेते आणि राणे समितीचे अध्यक्ष या नात्याने सरकार आणि मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मध्यस्थी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचेही राणेंनी म्हटले.
प्रश्न सोडवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा लागेल, त्यामुळे राज्यामध्ये सुरू असणारे आंदोलन मागे घेण्याची विनंती नारायण राणे यांनी केली आहे. तसेच आंदोलन थांबल्यास सरकार तातडीने निर्णय घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार असल्याचेही राणे यांनी सांगितले. तसेच सरकार आरक्षण देण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *