महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक- अध्यक्ष, खासदार श्री. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथील कसाळ – पडवे येथे उभारलेले भव्य दिव्य असे एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी संजीवनी ठरत आहे. हॉस्पिटल मध्ये असलेल्या जागतिक दर्जाच्या सुखसोयीं पाहून येथे आलेला रुग्ण दाखल होण्याआधीच अर्धा बरा होत आहे. येथील सुविधा पाहून रुग्ण आणि त्याच्या सोबत आलेले नातेवाईक अक्षरशः भाराहून जात आहेत. येथे असलेले तज्ञ् डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची सर्वोतोपरी काळजी घेतली जाते.
आणि यामुळेच येथून डिस्चार्ज घेऊन घरी परतलेल्या प्रत्येक रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी लाईफ टाईम हॉस्पिटल येथील सर्व डॉक्टर्स व स्टाफचे आणि या सर्व सोयी ज्यांच्या कठोर मेहनतीने जिल्हावासीयांना उपलब्ध झाल्या ते म्हणजे माजी मुख्यमंत्री खासदार श्री.नारायण राणे यांचे प्रत्यक्ष भेटून, पत्राद्वारे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
अशाच एका रुग्णाच्या नातेवाईकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री.राणे यांच्या लाईफ टाईम हॉस्पिटलचे मानलेले आभार
राणेंचे एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल गरीबांसाठी संजीवनी
माझ्या मित्राच्या आईला सौ. सुनीता खोडे रा.कोंडये,ता.राजापूर याना फिट येत असल्यामुळे आज आम्ही तिला रुग्णवाहिकेने या हॉस्पिटलमध्ये नेले.तिथे रुग्णवाहिका पोहचल्यावर लगेच तिला केसपेपरची वाट न बघता ऍडमिट करून घेण्यात आले.
डॉ. शर्मा,डॉ. कुलकर्णी यांनी स्वतः येऊन सर्व अगोदरचे रिपोर्ट पाहून लागलीच उपचार सुरु केले.इथला स्टाफ एवढा चांगला आहे की,कोणताही गर्व न करता सर्वाना सहकार्य करतात.
दुपारी पेशन्टला उत्तम प्रतीचे जेवण मिळाले.
आम्हालाही हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये उत्तम प्रतीचे शाकाहारी जेवण फक्त ५०/-रुपयांत मिळाले.
हॉस्पिटलचा सर्व परिसर एवढा स्वच्छ आहे की तिथे कचरा टाकायला आपल्यालाच लाज वाटेल.
खरच रत्नागिरी सिंधुदूर्गवासीयांसाठी राणे कुटूंबीय झटतात ते या हॉस्पिटल वरून दिसून येते.
श्री.संतोष धुरत.
श्री.भगवती रामेश्वर ट्रॅव्हल्स
कोंडये,ता.राजापूर.