maharashtra eco tourism development board

निसर्ग पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्रात वन पर्यटनाची क्रांती ठरणार

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याच्या निसर्ग पर्यटनाचे मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील लिमये यांच्या प्रभावी प्रशासकीय कार्यक्षमतेने राज्य वनविभागाच्या निसर्ग पर्यटन मंडळामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. राज्याचे वनमंत्री मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ वन खात्याशी निगडित असलेल्या ३५० पेक्षा अधिक प्रेक्षणीय वन स्थळांचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. त्यातील ६० पेक्षा अधिक ठिकाणी निसर्ग पर्यटन विकासाचे काम सुरु झाले आहे.

मा. श्री सुनील लिमये यांनी अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रातील वन विभागाच्या मुख्य तीन परिक्षेत्रातील प्रमुख वनविभाग अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आराखडा आयोजन सुरु केले आहे.

sunil limye

स्वतः श्री. लिमये यांची किल्ले आणि गडकोट यांच्या विषयी असणारी आस्था व या विषयात अभ्यास आहे, आज पर्यंत त्यांनी ७० पेक्षा जास्त किल्ले गडकोटांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. या अनुभवातुन निसर्ग पर्यटन मंडळाच्या माध्यमाने महाराष्ट्रातील ४०८ ऐतिहासिक किल्यांपैकी ३३३ किल्ले जिथे भेट देणे शक्य आहे, अश्या किल्ल्यांच्या भोवती असणाऱ्या वनभूमीमध्ये निसर्ग पर्यटन विकास अभियानाच्या योजनाकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात या योजनेसाठी सामाजिक संस्था व निसर्गप्रेमींनी देखील सहभाग घ्यावा व आपल्या विभागातील किल्ले व गडकोट व त्या भोवती असणाऱ्या वनविभागाच्या वनभूमीच्या निसर्ग संप्पनतेत वाढ करण्याकरिता वनखात्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा व अशा सूचनांचे आराखडे निसर्ग पर्यटन विकास मंडळातर्फे तयार केले जातील, असे प्रतिपादन श्री . लिमये यांनी केले.

नुकतीच विदर्भ विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक नागपूर मध्ये संपन्न झाली. यामध्ये निसर्ग विकास मंडळाकडे वनपर्यटन स्थळांच्या निर्मिती करिता प्रस्थाव कश्या पद्धतीने तयार करण्यात यावे, तसेच वनामध्ये कोणतेही प्रदूषण किंवा कायमस्वरूपी बांधकाम होणार नाही याची दक्षता घेऊन महाराष्ट्रातील वन पर्यटन वाढविण्यासंदर्भात श्री. लिमये यांचे मार्गदर्शन वनपर्यटनाला नवी दिशा देणारे ठरेल.

maharashtra eco tourism development board 2

शालेय विद्यार्थ्यांसाठी वन व निसर्गाविषयी प्रेम व जिज्ञासा जागरूक व्हावी याकरिता महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांना वन निसर्ग पर्यटन विकास मंडळातर्फे एक दिवसीय वन भोजन व सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. वनासंदर्भातील वन्य प्राणी व वनस्पती संदर्भात चित्रफिती व चित्रांच्या माध्यमातुन “वन अनुभव” अभियानाचे नियोजन देखील होणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जंगलात एक दिवस हा अनुभव निसर्ग पर्यटन मंडळातर्फे आनंद देणारा ठरणार आहे.

maharashtra eco tourism development board 1

एकंदरीत निसर्ग पर्यटन विकास मंडळामार्फत मा. वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून व श्री सुनिल लिमये यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटन विकास मंडळ जुनी कात टाकुन नवीन पालवी पल्लवीत करीत आहे, असा विश्वास वाटतो. नव्या पिढीला वनाविषयी उत्सुकता व प्रेम निर्माण करण्याकरिता सामाजिक संस्था व निसर्गप्रेमींचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.

 

yuva utthan

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *