DjATR3gXsAYtu2p

दिल्लीत पावसाचा कहर,रस्त्यांसोबत पुलांवरही साचलं पाणी

देश

दिल्लीच्या एनसीआर भागात सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. दिल्लीत अनेक भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलं आहे. नोएडा, गाजियाबाद, गुरुग्राममध्ये पावसाची संततधार आहे.दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गाजियाबादला पावसाचा खूप मोठा फटका बसला असून वसुंधरा येथे रस्ता खचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. नोएडा, गाजियाबाद आणि गुडगाव येथे रस्त्यांवर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
हवामान खात्याने दिल्ली-एनसीआरमध्ये तुफान पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. उत्तर भारतात पुढील पाच दिवस पाऊस पडत राहील असा अंदाज आहे. हवामानात कोणताही बदल होणार नसल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर पश्चिम भारतातही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *