crime

अलिबागमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या परदेशी महिलांना अटक

कोकण

अमेरिकेतील हायप्रोफाईल महिलांच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश बुधवारी अलिबाग पोलिसांनी केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या कारवाईत नऊ जणांना बेडय़ा ठोकण्यात आल्या असून त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अलिबागजवळील रेडीसन या सेव्हन स्टॉर रिसॉर्टमध्ये हा सेक्स रॅकेट सुरू होता. धक्कादायक म्हणजे बंगळुरू, दिल्ली, पुणे, चंदीगढ, हैदराबाद अशा मोठमोठय़ा शहरांमध्ये या महिला एका रात्रीसाठी लाखो रुपयांचा सौदा करीत होत्या.
अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथे रेडिसन हे मोठे हॉटेल असून तेथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शेख यांना मिळाली होती. त्यानुसार या कॉल गर्लचे अकाऊंट असलेल्या आयसीआयसीआय बँकेत काही पैसेही भरले. इतकेच नाही तर तीन बोगस ग्राहकांना पाठवल्यानंतर रेडिसन रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला. यामध्ये संदीपकुमार सिंह (३० रा. धारावी), नितेश सिंग (४० रा.
विरार), नरेश खाटील (४२ रा. वांद्रे), डॅफनी क्लेरा लिकन पॅपी (६०- रा. भाईंदर) या दलांलाबरोबरच कोलंबिया, अमेरिकेतून आलेल्या पाच महिलांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *