index

भ्रष्टाचारविरोधी संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर

देश

आता लाच घेणाऱ्याबरोबरच ती देणाऱ्यालाही शिक्षा होणार आहे. यासंबंधीच्या विधेयकाला आज संसदेने मंजुरी दिली. त्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी आणखी कठोर होणार आहेत.
भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरूस्ती विधेयकाला मागील आठवड्यात राज्यसभेने मान्यता दिली होती. त्यावर आज लोकसभेनेही शिक्कामोर्तब केले. केवळ लाच स्वीकारणेच नव्हे तर देणेही गुन्हा ठरणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संबंधित विधेयक मंजुरीसाठी मांडताना म्हटले. भ्रष्टाचार बिल्कूल खपवून न घेण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे. या विधेयकात लाच घेणाऱ्यावर दंडासह तीन ते ७ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच्या १९८८च्या कायद्यात बदल करुन हे नवे विधेयक आणण्यात आले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *