rail-roko

आज मुंबई बंदची हाक, जोगेश्वरी आणि ठाण्यात रेल रोको

मुंबई

आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह सातारा बंदची हाक दिली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा समाजातर्फे मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. आता बुधवारी मुंबई आणि परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे.
आंदोलकांनी सकाळपासूनच ठाण्यात रस्त्यावर आंदोलन केलं. सुरुवातीला तीन हात नाक्याजवळ महामार्गावर आंदोलन केल्यानंतर ठाणे स्टेशनवर आंदोलकांनी रेल्वे अडवली. ठाण्याहून सुटणारी लोकल अडवली. आंदोलकांनी रेल्वेमार्ग रोखला आहे.
सकाळी 9.15 – जोगेश्वरीला लोकल अडवली
आंदोलकांनी अप फास्ट लोकल रोखून धरली. काही वेळ आंदोलन रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास वेस्टर्न रेल्वेची सेवा सुरळीत सुरू झाली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *