d8f3c915931f19b09b9d15192dcfa3f1

मराठा क्रांती मोर्चा:आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक

मुंबई

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवांसह शाळा-महाविद्यालये आणि स्कूलबस, दूध- भाजीपाला वगळण्यात आले असून बंददरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्यात आले होते.
मराठा समाजास आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत सरकारने जाहीर केलेली ७२ हजार जागांवरील नोकरभरती स्थगित करावी या व अन्य मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. सोमवारी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले आहे. मंगळवारी दादरच्या शिवाजी मंदिर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत बुधवारच्या मुंबई बंदचा निर्णय घेण्यात आला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *