maratha kranti morcha

मराठा आरक्षणाबाबत भायखळा येथे शासनाविरोधात निदर्शने

मुंबई

आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला मराठा समाज मोर्चाचे पडसाद राज्यभरात पहायला मिळत आहेत.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला होता. मराठा आरक्षणाबाबत भायखळा रेल्वे स्टेशन येथे महाराष्ट्र शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. भायखळा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मधु चव्हाण हे देखील याठिकाणी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेलं आंदोलन तीव्र झालं असून, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन सुरु झालं आहे. याचाच निषेध म्हणून मुंबईत आज बंद पुकारण्यात आला होता.

भायखळा रेल्वे स्टेशन येथे उपस्थित सर्व मराठा बांधवांनी शहीद काकासाहेब शिंदे-पाटील यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी माजी आमदार मधु चव्हाण तसेच समिर चव्हाण हेही उपस्थित होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *