news-8-14

धक्कादायक ! मुलुंडमध्ये धावत्या रिक्षेवर झाडाची फांदी पडून दोघांचा मृत्यू

मुंबई

मुलुंडमध्ये धावत्या रिक्षेवर झाडाची फांदी पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. रिक्षाचालक आणि पुरुष प्रवाशाचा यात मृत्यू झाला असून रिक्षेत एक महिला प्रवासी देखील होती. तिला दुखापत झाली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
मुलुंड कॉलनी येथे गुरुगोविंद सिंग रोडवरील चौकात पिंपळाचे झाड असून या झाडाची एक फांदी रस्त्यावर पडली. याच दरम्यान तिथून एक रिक्षा जात होती. फांदी या रिक्षेवर पडल्याने रिक्षेतील चालक आणि अन्य दोन प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रिक्षाचालक आणि पुरुष प्रवाशाचा मृत्यू झाला. महिला प्रवासी या घटनेत जखमी झाली असली तरी तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *