pravin darekar

आमदार श्री. प्रवीण दरेकर यांच्या कोकण विकास स्वप्नपुर्तीची सुरुवात…

महाराष्ट्र

कोकण हा निसर्ग समृद्ध, बुद्धिवान कोकणवासीयांचा प्रांत आहे. कोकणातुन महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री मिळाले. आजवर अनेक उपक्रम उद्योग आले, परंतु कोकणातील विद्यार्थ्यांना मेडिकल शिक्षणाकरिता शहरात किंवा पश्चिम महाराष्ट्रात जावे लागत आहे. याचे शल्य कोकणातील पोलादपूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम डोंगराळ भागातील शेतकरी कुटुंबातील श्री. प्रवीण दरेकर यांना होते आणि म्हणूनच विधानसभेतील उत्तम संसद सदस्य पुरस्कार प्राप्त व अभ्यासु वृत्तीमुळे पुन्हा आमदार झालेले लोकनेते यांनी महाड तालुक्यात आयुर्वेद महाविद्यालय सुरु व्हावे, याकरिता मागच्या अधिवेशनात प्रयत्न केले. व आयुर्वेदिक कॉलेज महाड तालुक्यात मंजुर करून घेतले. त्याची पूर्वतयारी सुरु झाली आहे.

चालु अधिवेशनाच्या पावसाळी सत्रात कोकणाला शोभेल अश्या कणखर भुमिकेत शासकीय मेडिकल कॉलेज कोकणाला मिळावे म्हणुन शासनाकडे आग्रही भुमिका घेतली आणि गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत असणाऱ्या कोकणातील एक आयुर्वेद महाविद्यालय आणि आता वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली.

आमदार श्री. प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाने कोकणच्या विकास पाऊल वाटा प्रकाशित होत आहेत.

श्री. प्रवीण भाऊंचे मा. ना. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्यावर असणारे स्नेहाचे नाते आणि भाऊंच्या शब्दांकरिता मा. ना. गिरीशभाऊ यांनी दिलेली भेट कोकणवासियांकरिता अविस्मरणीय आहे.

कोकणात वाढत्या पर्यटनाचा उद्योग लक्षात घेऊन आ. श्री. प्रवीणजी यांनी मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्याकडुन महाबळेश्वर, दापोली हा रस्ता नॅशनल हायवे मध्ये समाविष्ठ करण्यास मंजुरी घेतली, हा देखील कोकण पर्यटनाच्या दृष्टीने फार मोठी उपलब्धी ठरणार आहे.

अत्यंत सालस अभ्यासु आणि राजकारणापलीकडे विकास कामांना प्राधान्य देणारे तरुण तडपदार व्यक्तिमत्व म्हणुन श्री. प्रवीण भाऊंचा कोकणातील लोकसंग्रह वाढत आहे, परंतु त्याही पेक्षा कोकणच्या विकासाचा इतिहास लिहिताना आ. श्री. प्रवीणभाऊ यांचा ठळक उल्लेख कोकणचे लोकनेते आमदार श्री. प्रवीणभाऊ दरेकर असा झाल्याशिवाय राहणार नाही. समस्त कोकणवासीय तरुणांच्यावतीने प्रवीणभाऊ आपणांस लक्ष लक्ष मनस्वी धन्यवाद….

हिरवळ-वनराई फाउंडेशन

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *