Suicide-784x441

कॉलेजच्या टेरेसवरुन उडी मारून विध्यार्थीनीची आत्महत्या

महाराष्ट्र

लातूर येथील त्रिपूरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनीने महाविद्यालयाच्या टेरेसवरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थीनीच्या वडीलांनी पोलीसांकडे केली आहे.
राज्यभरातून दरवर्षी २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी लातूर शहरात शिक्षणासाठी दाखल होतात. अशीच कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील एका गावामधून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थीनीने १७ जुलै रोजी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारलेली होती. जखमी झालेल्या त्या मुलीस खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिचे वडिल मुबारक महंमद बारगीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महाविद्यालयातील युवराज यादव नावाचा मुलगा तिला त्रास देत होता. या कारणामुळे तिने फेब्रुवारी २०१८ मध्ये हाताची नस कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही त्याचा त्रास सूरूच राहिल्याने तीने हे पाउल उचलल्याचा आरोप तीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीच्या आत्महत्येस युवराज यादव आणि कॉलेज प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी मुबारक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *