297394-new100note

आता लवकरच चलनात येणार शंभर रुपयांची नवी नोट

देश

नोट बंदीनंतर २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटात चलनात आल्या. त्यानंतर ५० रुपये, २० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्यात. आता १०० रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे. शंभर रुपयांची नवीन नोट चलनात आणणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेकडून करण्यात आली आहे. ही नोट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.
या नव्या नोटेचे फोटो आरबीआयने नुकतेच जारी केले आहेत. या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा असून त्यावर गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचे छायाचित्र आहे. या नोटेच्या डिझाईनला म्हैसूरच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या नोटेची साइज ६६ मिमी X १४२ मिमी असेल. ही नोट सध्या अस्तिवात असलेल्या १०० रूपयांच्या नोटेपेक्षा छोटी आणि १० रूपयांच्या नोटेपेक्षा मोठी असेल. ही नोट बाजारात आल्यानंतर छपाईचा वेग वाढवण्यात येईल, असे आरबीआयने म्हटले आहे.
ही नवी नोट ऑगस्ट अखेरपर्यंत बॅंकांच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. दरम्यान, आरबीआयने नोटाबंदीनंतर दोनशे, दहा रुपये आणि पन्नास रुपयाची नवी नोट जारी केली होती. या नोटा आता बाजारात उपलब्ध आहेत. त्यानंतर पुन्हा एक नवी नोट जारी केली जाणार आहे. नवी नोट जारी करण्यात आली असली तरी जुनी शंभरची नोटही चलनात असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *