DicNDpWWsAAfFQs

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात,दहा जणांचा मृत्यू

देश

उत्तराखंडमध्ये परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत. ऋषिकेश-गंगोत्री महामार्गावरील सूर्यधर येथे हा अपघात झाला.
गुरुवारी सकाळी उत्तराखंड परिवहन मंडळाची बस ऋषिकेश गंगोत्री महामार्गावरून जात असताना सूर्यधर येथे ही बस २५० मीटर खोल दरीत पडली. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले. स्थानिक प्रशासन आणि पोलिस अपघातस्थळी दाखल झाले असून, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, अपघातग्रस्त बसमधून २५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *