1

देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर लवकरच होणार मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध

देश

देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लवकरच मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता फ्री वाय-फायचा लाभ घेता येणार आहे. लोकसभेत बुधवारी (18 जुलै) एका प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी याबाबत माहिती दिली.
वर्ष २०१६-१७मध्ये १००, २०१७-१८मध्ये २०० तर २०१८-१९ या वर्षात ५०० स्टेशनांवर वाय-फाय सुविधा पुरवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते, त्यानुसार आतापर्यंत देशातील ७०७ स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र हे करताना रेल्वेच्या तिजोरीवर याचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही याचीही काळजी घेतली जाईल असंही गोहेन यांनी सांगितलं.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *