297201-g-noida-3

उत्तर प्रदेशात दोन इमारती कोसळल्या; ३ ठार

देश

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये एक चार मजली आणि दुसरी बांधकाम सुरु असलेली सहा मजली इमारत कोसळली. शाहाबेरी परिसरात मंगळवारी रात्री उशिराने हा अपघात झाला असून यामध्ये जवळपास ५० जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृतदेह हाती लागले असून यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पोलीस आणि एनडीआरएफची चार पथके घटनास्थळी पोहचली असून बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे.
शाहाबेरी परिसरातील चार मजली इमारतीत १८ कुटुंबे राहत होती, यामधील ३० ते ३२ जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता आहे. तर बांधकाम सुरू असलेल्या सहा मजली इमारतीमध्ये कामगार झोपले होते. त्यामुळे दोन्ही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास ५० जण अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, ‘जिल्हा प्रशासन, पोलीस व राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदत व बचावकार्याला तातडीने सुरुवात केली आहे. मात्र, सध्या ढिगारा जास्त असल्याने अडकलेल्या जखमी व मृतांची निश्चित संख्या समजू शकलेली नाही.’, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी दिली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *