f02bdfe2cae639d2bfece546a74776ec

आता एल्फिन्स्टन रोड नव्हे, ‘प्रभादेवी’ !

मुंबई

एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या नामांतराची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बुधवारपासून प्रभादेवी होईल. १७ जुलैच्या मध्यरात्रीपासून या नवीन नावाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात आदरार्थी ‘महाराज’ शब्दाचा समावेश करावा, या मागणीसह एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामांतर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. या मागणीनुसार राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारकडून जून २०१७ मध्ये अधिसूचना काढल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात ‘महाराज’ शब्दाचा समावेश करण्यात आला आणि एल्फिन्स्टन स्थानकाचे प्रभादेवी नामांतर करण्याचीही मंजुरी दिली.
१७ जुलैच्या मध्यरात्री म्हणजेच १२ वाजल्यापासून एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नाव होईल. त्यासाठी आवश्यक नामफलक, उद्घोषणा इत्यादींमध्ये बदलही करण्यात आले आहेत. लवकरच तिकिटांमध्येही बदल होतील, असेही सांगण्यात आले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *