ae6367e1c446b2fe0f2127bbd8cc439f

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद

क्रीडा

तिसऱ्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ३ वन-डे सामन्यांची मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली. मात्र पराभवानंतरही विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे. कर्णधार या नात्याने सर्वात जलद ३ हजार धावा करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर कोहलीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

विराट कोहलीने केवळ ४९ डावांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हीलियर्सच्या नावावर सर्वात जलद ३ हजार धावांचा विक्रम जमा होता. डिव्हीलियर्सने ६० डावांमध्ये ही किमया साधली होती. तर सौरव गांगुलीने आपल्या कर्णधारपदाच्या काळात ७४ डावांमध्ये तर महेंद्रसिंह धोनीने ७० डावांमध्ये हा विक्रम केला होता.कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत ७१ धावांची अर्धशतकी खेळी केली. कोहलीने कालच्या सामन्यात वन-डे कारकिर्दीतलं ४८ वं अर्धशतक झळकावलं. आदिल रशिदच्या गोलंदाजीवर कोहली त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *