१९ वर्षाखालील भारत विरुद्ध श्रीलंका संघात मंगळवारी (१७ जुलै) कोलंबो येथील नॉडेस्क्रीप्ट क्रिकेट क्लबच्या मैदानावर पहिला कोसोटी सामना सुरु झाला आहे.
या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुनने आपल्या १२ व्या चेंडूवर बळी मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार आगमन केले आहे.
या चार दिवसीय कसोटी सामन्यात श्रीलंका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.भारतीय कर्णधार अनुज रावतने भारताकडून पहिले षटक टाकण्यासाठी अर्जुन तेंडूलकरला पाचारण केले.
आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अर्जुन तेंडुलकर तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकन सलामीवीर कमिल मिशाराला पायचीत करत भारतासाठी आणि त्याचा वैयक्तिक पहिला बळी मिळवला.
Share on Social Media