8ce14dfceac87ad2e37e460428053bd4

नोटाबंदीच्या काळातला ओव्हरटाइम परत करा – स्टेट बँकेचा कर्मचाऱ्यांना फर्मान

देश

नोटाबंदीच्या काळात बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडला होता. या काळात कामाच्या वेळांव्यतिरिक्त केलेल्या या कामासाठी ओव्हरटाइम दिला जाईल असे व्यवस्थापनाने जाहीर केले होते. स्टेट बँकेच्या समूहातील स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर यांचा समावेश असून या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम दिला. मात्र, आता या स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या अन्य बँकांच्या 70 हजार कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिलेला ओव्हरटाइम परत करा असे सांगण्यात येत आहे.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार स्टेट बँकेनं सगळ्या विभागीय मुख्यालयांना पत्र पाठवलं असून फक्त मुख्य स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्यात येईल आणि नोटाबंदीच्या काळात जास्तीचं काम केलेल्या परंतु स्टेट बँकेच्या तत्कालिन संलग्न बँकांच्या कर्मचाऱ्यांना असा ओव्हरटाइम देता येणार नाही. हा ओव्हरटाइम मुख्य स्टेट बँकेच्या शाखांमध्ये काम करणाऱ्यांसाठी फक्त होता आणि संलग्न बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्हता असं नमूद करण्यात आलं आहे.
नोटाबंदीच्या त्या कालावधीत या बँका स्टेट बँकेत विलिन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनाओव्हरटाइम देण्याची जबाबदारी तत्कालिन बँकांची होती, स्टेट बँकेची नाही असा पवित्रा स्टेट बँकेच्या व्यवसथापनानं घेतला असल्याचे इंडिया टुडेनं म्हटलं आहे.
या वर्षी मार्च ते मे दरम्यान कर्मचाऱ्यांना 17 हजार ते 30 हजार या दरम्यान ओव्हरटाइम देण्यात आला. परंतु आता मात्र, संलग्न बँकेच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्यास आपण बांदील नव्हतो असा पवित्रा घेत स्टेट बँकेने या कर्मचाऱ्यांनी घेतलेला ओवहरटाइम परत करावा असे सांगितले आहे. या मुद्यावरून कर्मचारी संघटनाही नाराज झाल्या आहेत. नोटाबंदीच्या काळात स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देतानाच चूक झाली आहे कारण हे कर्मचारी स्टेट बँकेत 2017 मध्ये विलिन झाले असं मत एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. खरंतर ती स्टेट बँकेची जबाबदारी नव्हती, परंतु त्यांना ओव्हरटाइम देऊन झाला आहे आणि त्यामुळे ती चूक निस्तरण्यासाठी ओव्हरटाइम परत करण्याचा आदेश काढण्यात आल्याचे बँकेच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *