kudal-malvan

कुडाळ – मालवणला लाभलेले विकासाचे मॉडेल गेल्या चार वर्षात कुठे गायब झाले ?

कोकण

कुडाळ – मालवण वासीयांना गेल्या चार वर्षात काय मिळाले ?

माजी मुख्यमंत्री मा.श्री नारायणराव राणे ज्या दिवशी सभागृहात नव्हते, त्या दिवसापासून कुडाळ-मालवण आणि कोकण वासीयांनाचे नुकसान झाले. सध्याचे आमदार वैभव नाईक काय करतात हे बहुतेक लोकांना माहीत नसेल. २०१४ मध्ये नारायण राणे यांचा पराभव झाला आणि कोकणच्या विकासाला खीळ बसली. परंतु त्यांच्या जागेवर निवडणून आलेला उमेदवार जेम तेम एक महिना प्रसिद्धी मध्ये होता. नंतर त्या आमदाराचे काय झाले हे अख्ख्या कुडाळ मालवण वासीयांनि बघितले.

फक्त पेपरमध्ये जाहिराती देऊन विकास कामे होत नाहीत. मंजुरी दिली म्हणजे काम पूर्ण झाले असे नसते. आताचे आमदार फक्त जाहिरात बाजीला आणि बॅनर बाजीला विकास कामे करून दाखवली असे समजून धन्यता मानत आहेत. कुडाळ मालवण वासीयांना त्यांच्याकडून झालेली २०१४ ची चूक आता त्यांना सहन करावी लागत आहे आणि ती आता सर्वत्र बोलून दाखवत आहेत.

ज्या माणसाला विकास काय असतो ते माहीत नाही. विकास कामे कशी करायची ही माहीत नाहीत. फक्त काही लोकांना मॅनेज केलं म्हणजे कामे पूर्ण झालेली नाहीत. विधिमंडळा मध्ये कधी आवाज आला नाही गेली ४ वर्षे. एखादा ढ विद्यार्थी फक्त दररोज शाळेत जातो पण तो शेवटच्या बाकावर जाऊन बसतो तशी अवस्था सध्याच्या आमदाराची आहे. कुडाळ मालवणसाठी कोकणच्या हितासाठी कधी आवाज उठवताना दिसले नाहीत.

कुडाळ मालवणचे रस्ते, विकास कामे अशीच ठप्प पडली आहेत फक्त नावाला आमदार पण ती कशी करायची हे अजून माहीत नाही. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की काही ठिकाणी बैलगाडी ही जाणार नाही. गेली चार वर्षे फक्त अभ्यास करण्यात गेली आता पुढील एक वर्ष परत खोटी आश्वासने देण्यात जातील.

फक्त अगरबत्ती,धूप,तेल,मोदक दिले म्हणजे कामे झाली नाहीत किंवा लोकांचा विकास झालेला नाही. बारशे,लग्न या सोहळ्याला उपस्थित राहून मी जनते बरोबर आहे दाखवून कुडाळ मालवणला भकास केले.

कुडाळ मालवण वासीयांनू आता पासून जागे व्हा २०१४ ला जी पुनरावृत्ती झाली ती आता नको. गेल्या चार वर्षांत कुडाळ मालवण आणखी १५ वर्षे मागे गेला ती चूक आता नको. हा एकच विचार करून २०१९ ला परत हा लोकप्रिनिधी नको हा विचार करा आणि परत घरी पाठवून द्या.

२०१४ ला झालेली चूक आता सुधारू.

 

adesh more

 

 

 

 

 

आदेश मोरे

 

incense sticks

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *