lad

समाजकार्य करील त्याला कोण मारील ?

कोकण वाचकांचे लेख

वार सोमवार ०९/०७/२०१८ ची ती सकाळ. मुंबईत पाऊस धो-धो पडत होता. रुळावरून पाण्यातून रेल्वे, मार्ग काढीत होत्या. त्या पावसातून कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे खजिनदार तसेच श्रीकाँम क्रीयेशन ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री तुकारामजी लाड साहेब ,सचिव हर्षल गुरव व खजिनदार त्यांचे मोठे भाऊ राजाराम लाड साहेब तिघे दादरवरून चणेऱ्याला पुस्तके वाटपाच्या कार्यक्रमासाठी दिव्याला ९:१० ची दिवा रोहा पॅसेंजर गाडी पकडायची होती म्हणून घरातून सकाळी निघाले.

दिव्याला पोहचायला उशीर झाला होता. गाडी धावत धावतच पकडली. सोबत शालेय साहित्य गाडी पकडल्यावर अचानक लाड साहेबांचे मोठे बंधू यांच्या पोटात दुखायला लागले. खूप वेळ झाला दुखणं थांबत नव्हते. काय करावं सुचत न्हवते. पाऊस काही केल्या थांबत नव्हता. पाठीमागे फिरायचं तर दिलेला शब्द मोडणार. योगायोगाने रोह्याची डॉक्टर फॅमिली त्या डब्यातून प्रवास करीत होते. त्यांच्या ही गोस्ट लक्षात आली त्यांनी काळजी पूर्वक रोहा पर्यंत धीर दिला. प्रसंगी चणेरा येथे पोहचायला गाडीची सोय करतो सांगितले. कसे बसे चणेरा येथे पोहचले तो पर्यंत दुखायचे थांबले होते. हे सर्व लाड साहेबानी कार्यक्रम झाल्यानंतर सांगितले. त्यानी धीर सोडला नाही तसेच संयम ठेवला मग आम्ही, डॉ.चंद्रकांत कोठारी कार्यक्रमात उपस्थित होते त्यांना लगेच दाखवून तपासणी करून त्यांना चेहऱ्यावर थोडा सुद्धा आलेल्या संकटाची चाहूल न देता लाड साहेबानी सुखरूप मुंबई गाठली. अशा धीरगंभीर , मला शब्द दिला म्हणून कार्यक्रमाला पोहचणाऱ्या नेहमी दुसऱ्यांना संधी मोठेपणा देणारा अवलीयाला माझा मनापासून सलाम. हे सर्व करीत असताना त्यांनी तितक्याच तोडीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. घरात बसून समाज कार्य करणारे मी भरपूर पाहिलेत पण मैदानात उतरून समाजकार्याची आवड निस्वार्थपणाने मनापासून करणाऱ्यांची माझ्या या प्रवासात साखळी निर्माण होताना दिसत आहे.

गणेश भगत

incense sticks

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *