mumbai

मी मुंबईकर, माझा काय दोष ?

मुंबई

लहानपणी पाऊस पडला तर सर्वात जास्त मजा वाटायची कि आज शाळेला सुट्टी … मोठे झाल्यावर कॉलेजचे लेक्चर बंक करून मित्र मैत्रिणीनं सोबत समुद्र किनारी तुंबलेल्या पाण्यात मजा चालायची. नोकरीला लागल्यावर ऑफिसला अघोषित सुट्टी मिळते ज्यात कुटुंबासोबत मजा चालायची.

परंतु आता पाऊस किंवा पावसाळा हा ऋतू .. ऋतुचक्रातून निघून जावा किंवा नसावा असे वाटायला लागलेय. तुम्ही म्हणाल, मी किती स्वार्थी आहे. पाऊस नाही पडला तर अन्न धान्य कसे पिकेल? शेतकऱ्यांचे काय होईल? हे मला पण कळते, परंतु पावसात एका नोकरदाराचे काय हाल होतात. त्याची विचारात सोय नाही.

पाऊस सुरु झाला कि थोडा थंडावा सुरु होतो. परंतु तोच पाऊस जेव्हा २-३ दिवस मुक्काम करतो, तेव्हा मात्र भीती वाटायला सुरुवात होते. आता पाणी तुंबणार बसेस बंद ,रिक्षा टॅक्शी बंद,रस्त्यावर तुंबलेले पाणीच पाणी. सर्वत्र एकच शांत परंतु भीतीचे भाव असतात.

कुठे कोणती बिल्डिंग पडते, कुठे शॉर्टसर्टिक,कुठे गुडगाभर तर कुठे कंबरे एवढे पाणी,सर्वत्र पाणी आणि घाणीचे साम्राज्य.

मला एक साधा प्रश्न पडतो, पाऊस फक्त एकच वर्ष पडतो का? मुंबई मध्ये पाऊस दरवर्षी पडतो. दरवर्षी पाणी का तुंबते? मुंबई बेटावर भर घालून बनली आहे. ठीक आहे परंतु, दरवर्षी तर पाऊस पडतो तर मग पावसाळा संपल्यावर सुद्धा पाण्याचा निचरा,नालेसफाई, सखल भागात पाण्याच्या निचऱ्याची तरतूद का केली जात नाही?

मुंबई महानगरपालिका नेहमी सांगते, आम्ही नालेसफाई पूर्ण केली. याचा अर्थ हा मानायचा का कि वर्षाला महानगर पालिका,पालिका कर्मचारी, प्रभागांचे नगरसेवक झोपलेले असतात का? वर्षभर हि साफ सफाई का होत नाही?

आम्हाचा पगार एकतर तुटपुंजा पण त्यातला ५०% खर्च पावसाळ्यात डेंगू ,मलेरिया ,लेप्टो यापासून वाचण्यासाठी, रक्त चेक करण्यासाठी, हॉस्पिटल व डॉक्टरवर होतो.

आमचे महापौरांचे मला हसायला येते. पावसाळ्याचपूर्वी ते म्हणाले कि मुंबईमध्ये MMRDA चे मेट्रोचे कामे चालू असल्यामुळे मुंबईमध्ये पाणी तुंबले तर आमची जबाबदारी नाही. मुंबई महानगर पालिकेत गेली २६ वर्षे एकच पक्ष सत्तेत आहे. आणि ते नेहमी ‘मुंबई फक्त आमची नाही कुणाच्या बापाची’ हि ब्रीद वाक्य वापरतात. परंतु जेव्हा असे पाणी दरवर्षी तुंबते, रोगराई पसरते तेव्हा मात्र जबाबदारी न घेता हे महापौर, नगरसेवक, पालिका कर्मचारी हात वर करतात. मग आम्ही मुंबईकरांनी जगायचे कोणाच्या जीवावर?

घरात डेंगू झाला तर ह्यांचे कर्मचारी येऊन त्या घराची कंप्लेंट करतात. प्लास्टिक वापरले तर ५००० रु दंड मागतात. रस्त्याच्या खड्ड्याने हाडे खिळखिळी होत आहेत. प्यायला गढूळ पाणी, आम्ही जगायचे कसे? आम्ही रेल्वेला,महानगर पालिकेला सर्वात जास्त महसूल दुप्पट देतो. मग चांगले जीवन जगायचे हा आमचा अधिकार आहे कि नाही ?

शेवटी एवढेच बोलेन मुंबईकरांनो, तुम्ही मालक आहात मुंबईचे त्यामुळे सहन करू नका. जाब विचारा आणि मुंबई स्वच्छ आणि सुंदर यांच्याकडून करून घ्या.

 

santosh kangne

 

 

 

 

 

संतोष देव कांगणे  (Mob.- 88505 11503)

आपल्या प्रतिक्रिया वरील व्हाट्सअप क्रमांकावर जरूर कळवा.

 

incense sticks

Share on Social Media
0

1 thought on “मी मुंबईकर, माझा काय दोष ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *