nilesh rane

राजदंड उचलला आता दंड देण्यास भाग पाडू नका- निलेश राणे

कोकण

चिपळूण (कुमार चव्हाण) : सभागृहात नाणार प्रकल्पाबाबतची खरी वस्तूस्थिती सरकारला कळावी, यासाठी आमदार नितेश राणे यांनी राजदंड उचलण्याचे काम केले. सभागृहात कोकणवासीयांची खरी व न्यायाची बाजू उचलून धरली. राजदंड उचलून त्याचे श्रेय घेण्याच्या शर्यतीत आम्ही नाही. नाणार प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आता गप्प बसणार नाही. आज राजदंड उचलला आता दंड देण्यास भाग पाडू नका, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दिला.
राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे गुुरुवारी राजापूर दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सभागृहातील या घटनेनंतर शिवसेनेचा खरा चेहरा कोकणवासीयांना दिसला. श्रेयवादासाठी शिवसेनेची सुरु असणारी केविलवाणी धडपड दिसून आली. त्यातच राज्याच्या उद्योगमंत्रींनी केलेले वक्तव्य हे दुर्दैव म्हणावे लागेल. मंत्रीपदाला न शोभणारे ते वक्तव्य होते, असा टोला निलेश राणे यांनी लगावला.

agarbatti 1

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *