suresh prabhu

अलौकिक व्यक्तिमत्वाचा वाढदिवस

देश

आदरणीय सुरेशजी प्रभू यांचा आज वाढदिवस इतर राजकीय नेत्यांसारखे वाढदिवसाचे सवंग लोकप्रियतेसाठी कार्यक्रम प्रभुजींना कधीही मान्य नाहीत. गेली सुमारे २५ वर्ष विद्वत्तेच्या आणि वैचारिक प्रगल्भतेच्या संस्कारातुन सुरेशजींची सामाजिक व राजकीय कारकीर्द सुरु आहे. कोकणाने भारताला राष्ट्रीय स्थरावर अनेक नेतृत्व दिले, सुरेशजींची राजकीय व सामाजिक कारकीर्द सदैव दैदीप्यमान राहीली आहे. सारस्वत बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा अत्यंत कमी वयात स्वीकारून सध्य स्थितीत अस्तित्वात असणाऱ्या बँकांच्या योजना प्रभुजींनी सारस्वत बँके मार्फत अनेक वर्ष पूर्वीच सुरु केल्या आहेत. तीर्थरूप बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेशजीं मधील अष्टपैलू विद्वान व्यक्तिमत्व हेरले आणि कार्यक्षम राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. मा. वाजपेयींबरोबर ऊर्जा, पर्यांवरणासारख्या खात्यांमधून प्रभू साहेबांचा प्रभाव होता. पर्यावरण विभागातील प्रभू साहेबांचे प्रभावी निर्णयामुळे देशामध्ये पर्यावरण खात्याला नवी ओळख मिळाली.
भारतामध्ये आज पर्यंतच्या इतिहासात विद्वात्तेचा आणि अभ्यासू वृत्तीचा सन्मान करून देशहिताकरिता मंत्री पद म्हणून निवड झालेले सुरेशजी प्रभू हे एकमेव सिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मंत्री मंडळात देखील रेल्वे मंत्री म्हणून प्रभावी कारकीर्द ठरली, ज्यांच्या निर्णयांचे योग्य प्रभावी पडसाद आता दिसू लागले आहेत. सध्यस्थितीत उद्योग, व्यापार व नागरी विमान उड्डाण मंत्री या खात्यांचा कार्यभार सांभाळताना संपूर्ण विश्वामध्ये भारताची अर्थनीती व उद्योगनीती मधुन अव्वल स्थान प्राप्त करून देण्यामध्ये सुरेश प्रभुजींच्या अनेक प्रशासकीय व आंतरराष्ट्रीय आर्थिक, औद्योगिक चाणाक्ष निर्णयांमुळेच शक्य झाले आहे. याची नोंद साऱ्या विश्वाने घेतली आहे. WTO मधील भारताचे प्रभुत्व सिद्ध करण्याकरिता प्रभुजींनी केलेली आंतरराष्ट्रीय राजनीती असेल किंवा दिल्ली मधील मिनी WTO च्या आयोजनाचे कौशल्य असेल, तसेच अनेक देशांबरोबर भारताचे अनेक वर्ष प्रलंबित असणारे अर्थ उद्योग विषयीचे करारनामे, धोरणात्मक निर्णय आता पर्यन्त अंदाजे ४५ पेक्षा जास्त देशांबरोबर प्रत्यक्षात अंमबजावणी पूर्णत्वाला जात आहेत.
कोकणातील या अलौकिक व्यक्तीमत्त्वाने कोकण विकास हाच ध्यास घेतलेला आहे. कोकणातील अनेक प्रलंबित योजनांचा पाठपुरावा होत आहे. मा. सुरेश प्रभुजींनी विकास कामात कधीही राजकीय विद्वेष ठेवला नाही व विकास कामांनाच प्राधान्य दिले. कोकणच्या नव्या युगातील नररत्न सुरेशजी प्रभू यांच्या मनातील समृद्ध कोकणाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता सारे कोकणवासीय त्यांच्या समृद्ध कार्यप्रणालीवर मनस्वी प्रेम करतात. भारतातील नव्या पिढीला शाश्वत विकासाकरिता उद्योग व अर्थनीती देणारे श्री. सुरेश प्रभुजींचा प्रत्येक निर्णय हा उज्वल व दैदिप्यमान इतिहास ठरणार आहे.
खरंतर भारतात सर्व राज्यांमधून श्री. सुरेश प्रभुजींच्या विद्वत्ते मुळेच सर्व स्थरातील मान्यवरांपासुन सामान्यांपर्यंत राष्ट्राचं प्रभावी नेतृत्व म्हणून सुरेशजींना स्वीकारले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील सर्व नामांकित उद्योग व सामाजिक संस्था राष्ट्राध्यक्ष व राजकीय नेते यांच्या समवेत थेट संवाद ठेवणारे आणि त्याच बरोबर कोकणातीलच नव्हे तर भारतातीलही उत्तम कार्य करणाऱ्या साऱ्या सामाजिक व राजकीय संस्था व व्यक्तीबरोबर थेट संवाद ठेवणारे श्री. सुरेश प्रभुजी हे कोकणाचे एकमेव मान बिंदू आहेत.
प्रभू साहेब आपण कधीच कोणाची वाढदिवसाची भेट वस्तू स्वीकारत नाही, परंतु कोकणवासीय आपल्याला सदैव प्रेमाची भेट देतील.. वाढदिवसानिमित्त साऱ्या कोकणवासीयांच्यावतीने श्री. सुरेश प्रभुजींना या शब्द सुमनांनी शुभेच्छा.

 

kishor dharia

 

 

 

 

 

 

किशोर धारिया 

हिरवळ -वनराई फाऊंडेशन

 

agarbatti 1

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *