unnamed

आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसांची करडी नजर

व्यापार

सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांना आता मोठा दणका मिळणार आहे. ज्या ग्रुपवर अफवांचा पाऊस पडत असतो अशा ग्रुपवर पोलिसांची करडी नजर राहील. पोलिसांना त्यांच्या त्यांच्या परिसरातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलंय. अफवा पसरवून कोणाला मारहाण करण्याचा आसुरी आनंद घ्यायचा तुमचा इरादा असेल तर आता तुमची खैर नाही. थेट पोलिसांशी तुमची गाठ असणार आहे. तुमच्या परिसरातले पोलीस आता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असणार आहेत. ग्रुपमधल्या संभाषणांवर पोलिसांची नजर असेल.
मुले पळवणारी टोळी समजून मारहाण होण्याच्या घटना जागोजागी घडत आहेत. या अफवांनी आत्तापर्यंत तब्बल ८ बळी घेतलेत. धुळ्यात तर एकाचवेळी पाच जणांचा बळी गेला. भविष्यात या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे. पोलीस शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या आदेशाने कामाला लावलं. मात्र आता बेजबाबदारपणे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांनो तुमची मजा कोणाच्या जीवावर उठत असेल तर पोलिसांना यात हस्तक्षेप करावाच लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *