295954-kawasakininja

कावासाकी निनजा ६५० भारतात लॉन्च

व्यापार

बाईक उत्पादक कावासाकी कंपनीने आपली निनजा ६५० ब्लॅक ही बाईक भारतात लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत ५.५० लाख रुपये (दिल्ली एक्सशोरूम) एवढी आहे. कावासाकी निनजाचे हे २०१९ सालचे मॉडेल असून याआधी मागच्यावर्षी निनजा केआरटी एडिशनमध्ये निळ्या रंगात आली होती. यावर्षी मात्र काळ्या रंगात निनजा लॉन्च करण्यात आली आहे.
६५० सीसीचे इंजिन या बाईकला देण्यात आले आहे. मागच्या वर्षी आलेली निनजा केआरटी एडिशन ५.६९ लाख रुपयांना होती. कावासाकी निनजाच्या या मॉडेलमध्ये एबीएस, इकोनॉमिकल रायडिंग इंडिकेटर, लो सीट हाईट, अपराईट रायडिंग पोजिशन, असिस्ट आणि स्लिपर क्लच हे फिचर्स देण्यात आले आहेत. या बाईकला पॅरलल ट्विन इंजिन डीओएचसीसोबत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *