DJjBh5WU8AApDi4

उत्तर प्रदेश मध्ये प्लास्टीक बंदीचा आदेश जारी

देश

महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक बंदी घालण्यात आली. या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 15 जुलैनंतर प्लास्टीक बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 15 जुलैनंतर प्लास्टीक कप, ग्लास आणि प्लास्टीक पिशव्यांचा वापर करु नये, असे आवाहन योगींनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केले. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आपले शरीर स्वास्थ आणि धरणीमातेला प्रदुषणापासून वाचविण्यासाठी प्लास्टीकचा वापर बंद करणे आवश्यक असल्याचेही योगींनी म्हटले. मात्र, यापूर्वीही अनेकवेळा उत्तर प्रदेशमध्ये प्लास्टीक बंदी करण्यात आली होती. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने नुकताच प्लास्टीक बंदीचा आदेश जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *