Vidhan-Bhavan

विधानभवन अंधारात, कामकाज ठप्प

महाराष्ट्र

नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन होतं आहे. मात्र शहरात होतं असलेल्या मुसळधार पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असून, यामुळे पुन्हा एकदा सरकारचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.पावसाळी अधिवेशन हे मुंबईतचं घ्यावं यासाठी विरोधक आग्रही होते. मात्र मुंबईमध्ये आमदार निवासाचं बांधकाम सुरु असल्याने हे अधिवेशन नागपूरलाचं होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.नागपूरमध्ये विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे विधीमंडळातील वीज पुरवठा खंडीत झाला. तळघरात पाणी साचल्याने विधान भवनातील वीज पुरवठा खंडीत झाल्याचे समजते. अंधारामुळे विधान भवनातील कामकाज ठप्प झाल्याने सरकारची नाचक्की झाली आहे. वीज नसल्याने कामकाज बंद करावे लागल्याची ही पहिलीच वेळ असून यासाठी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, अशी टीका विरोधकांनी केली.
नागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (शुक्रवारी) तिसरा दिवस आहे. गुरुवारी रात्रीपासून नागपूरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे विधान भवनाच्या परिसरात पाणी साचले. सकाळी विधान भवनात प्रवेश करताना आमदारांची तारांबळ उडत होती. काही वेळाने विधान भवनातील वीज पुरवठाही खंडीत झाला. यामुळे कामकाज ठप्प झाले. आमदारांना अंधारातच बसावे लागले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *