hope-foundation

होप फाउंडेशनच्या सुकन्या दत्तक पालक योजनेतून ५०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

कोकण
महाड – महाडसह रायगडमधील सामाजिक,शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या होप फाउंडेशनच्या सुकन्या  विद्यार्थिनी दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून ५०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते शनिवार दि. ७ जुलै २०१८ रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नरेंद्र महाडीक यांनी दिली.
 शनिवार दि. ७ जुलै २०१८ रोजी सकाळी १०.३० वा. विरेश्वर मंदिर सभागृह, महाड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला दि अण्णा साहेब सावंत अर्बन बँकेच्या चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत, महाडचे प्रांताधिकारी श्री. विठ्ठल इनामदार, डी.वाय.एस.पी. श्रीमती प्रांजली सोनावणे,महाड उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संभाजी पठारे, महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर जगताप, पूजा असोसिएट्सचे सुमित जैन, एल.आय.सी.महाड शाखेचे व्यवस्थापक श्री. किरण बागुल तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 सहयोग पुस्तकपेढीच्या माध्यमातून गतवर्षी शालेय,महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सुमारे तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तके आणि वह्या देण्यात आले होते. तसेच उमेद दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून महाड नगरपालिका शाळांतील तीस  विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले असून दिशा शिष्यवृत्ती योजनेतून एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देण्यात आली असल्याची माहिती नरेंद्र महाडीक यांनी दिली.
ग्रामीण भागातील अनेक निराधार,होतकरू,गरजू व शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक व गुणवत्ता वाढीकरीता विशेष योगदान देण्यात यावे म्हणून मा. श्रीमती शोभाताई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुकन्या विद्यार्थिनी दत्तक – पालक योजना या वर्षापासून सुरु करण्यात आलेले असून त्यास अनेक संवेदनशील पालकांनी मोलाचे सहकार्य करून हि योजना यशस्वी करण्याकरीता हातभार लावलेला आहे. यामधूनच महाड तालुक्यातील ३२ माध्यमिक शाळा व ५ महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थिनींना २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात या योजनेचा लाभ देण्याचा मानस असल्याचे श्री. महाडीक यांनी सांगितले.
agarbatti 1
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *