Melbourne-Cricket-Ground

जुगार,सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्या – विधी आयोग

क्रीडा

भारतात क्रिकेटसह अन्य खेळांमध्ये जुगार आणि सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस विधी आयोगाने सरकारकडे केली आहे. आपल्या अहवालात विधी आयोगाने मॅच फिक्सिंग आणि खेळातील फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याचीही शिफारस केली आहे. खेळातील सट्टेबाजी, जुगारावर पूर्णपणे बंदी घालणे शक्य होत नसल्यामुळे हे सर्व प्रकार बेकायदपणे सुरु आहेत. त्यातून काळा पैसा तयार होतोय. या गोष्टी पूर्णपणे रोखणे शक्य होणार नाही. त्यापेक्षा त्यावर नियंत्रण ठेऊन नियमन करणे हा व्यवहार्य पर्याय आहे असे आयोगाचे मत आहे.जुगार आणि सट्टेबाजी कायदेशीर करुन त्यावर कर आकारल्यास त्यातून चांगला महसूल जमा होऊ शकतो. ज्याचा वापर नंतर लोककल्याणासाठी करता येईल असे आयोगाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *