default

दुर्दैवी घटना ! जुहू समुद्रात पाच जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश

मुंबई

मुंबईतील जुहू चौपाटीवर पाच जण बुडाले आहेत, ही घटना गुरुवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमाराची आहे. बुडालेल्यांपैकी तिघांना पाण्याबाहेर काढण्यात आलं असून यातील वसिम खान हा बचावला आहे तर नाझिर गाझी आणि आणखी त्याच्या एका मित्राचा मृत्यू झाला आहे. त्याचं नाव अजून कळू शकलेलं नाहीये. हे सर्व तरुण अंधेरेतील डी.एन. नगरचे रहिवासी आहेत. इतरांचा शोध घेण्याचं काम आज सकाळपासून सुरु करण्यात आलं आहे.

बुडालेल्यांची नावे –
१) फरदीन सौदागार २) सोहेल खान ३) फैजल शेख ४) नाझिर गाजी ५) वसिम खान. या पाच पैकी वसिम खान आणि अन्य एकाला याला वाचवण्यात यश आले आहे.
१७ ते २२ वर्ष वयोगटातील पाच मित्र संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास जुहू चौपाटीवर पोहायला गेले होते. मात्र समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यातील चौघे जण बुडाले. गोदरेज चौपाटी आणि गांधीग्राम चौपाटीच्या मधल्या भागात ही घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *