thai-1-1

अडकलेल्या फुटबॉल संघाला गुहेतच देणार पोहोण्याचे प्रशिक्षण

क्रीडा विदेश

थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये अडकलेल्या थायलंडच्या संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघाचा तब्बल नऊ दिवसांनी शोध लागला असला तरी त्यांच्या बचावकार्यातील अडथळे अद्याप संपलेले नाही. ११ दिवस उजाडला तरी हा संघ आणि प्रशिक्षक सारे गुहेतच अडकले आहेत. अरुंद वाट आणि त्यातही पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून बचाव पथकानं नवीन शक्कल लढवली असून मुलं आणि प्रशिक्षकांना गुहेतच पोहोण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्यामुळे पाण्याच्या प्रवाहावर मात करत अडकलेल्या संघाला बाहेर काढण्यास बचाव पथाकाला यश मिळेल.
या पथकाने मुलांशी व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे बुधवारी संवाद साधला आणि त्यांना पोहोण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी पाणबुडे, समूपदेशक व नेवी सील्स हे सर्व उपस्थित होते. या १३ जणांना औषधे व अन्न पुरवत आहेत. ‘हे काम सोपे नाही’, असे सरकारचे म्हणने आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *