TH08BRIEFLY1AGNS2Q3KDI3jpgjpg

जगन्नाथ पुरी मंदिरात सर्वधर्मीयांना प्रवेश द्यावा : सर्वोच्च न्यायालय

देश

सर्वोच्च न्यायालयाने पुरी येथील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात सर्वधर्मीयांना प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले असून दुसऱ्यांच्या आस्थेला धक्का पोहोचवण्यास हिंदुत्व सांगत नाही. त्याचबरोबर दुसऱ्या धर्मात हिंदू धर्म हा अडथळा आणत नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
जगन्नाथ मंदिराच्या आवारातील गैरव्यवहार आणि सेवकांकडून भाविकांना दिली जाणारी वागणूक यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान एका विशिष्ट धर्माला मानणाऱ्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश देता येईल का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. जगन्नाथ पुरी मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. यावर सर्वोच्च न्यायालयाने मंदिर व्यवस्थापन समितीला निर्देश दिले. मंदिरात सर्व धर्मीयांना प्रवेश दिला पाहिजे. पण हा आमचा निर्णय नाही. मंदिर प्रशासनाने याबाबत विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.जगन्नाथ पुरी मंदिरात दुसऱ्या धर्मांतील भाविकांना ड्रेसकोड आणि अन्य कोणत्या अटींवर प्रवेश देता येईल, याबाबत राज्य आणि केंद्र सरकारनेही त्यांचे मत मांडावे, असे न्यायालयाने सांगितले. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून पैसे उकळू नये, असे निर्देशही मंदिर प्रशासनाला देण्यात आले आहेत.या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *