fb-post

आता अफवा रोखणार व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

व्यापार

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवे फीचर आणण्याचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे देशभरात अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे.
मंगळवारी व्हॉट्सअॅपला माहिती व प्रसारण मंत्रालयाने इशारा दिला होता, की हिंसेचे कारण बनणाऱ्या संदेशांना रोखण्यासाठी तात्काळ उपाय करा. कंपनीला सरकारने सांगितले होते, की जबाबदारीपासून तुम्ही दूर नाही जाऊ शकत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले होते, की हिंसक घटना गुन्हा असून कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. न्यायालयाने हे सुद्धा म्हटले होते, की अशा प्रकारच्या घटनांना रोखण्याची जबाबदारी राज्या सरकारांची आहे.
दरम्यान कंपनीने म्हटले, की लोकांची चिंता आम्हाला असून आम्ही ही गोष्ट लक्षात घेऊनच अॅप डिझाईन केले होते. त्याची माहिती लोकांना दिली जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील. व्हॉट्सअॅपचा गैरवापर रोखण्यासंबंधीही आम्ही आमच्यापरीने काम केले. आम्ही प्रॉडक्ट कंट्रोल, डिजिटल लिट्रेसी, फॅक्ट चेकिंग अॅडव्होकेसी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाय केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *