reliance-jiophone

रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला,जिओफोन २ जी घोषणा

व्यापार

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीला मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची सुरुवात झाली आहे. यामध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली. जिओ फोन-२ हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन आहे. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

रिलायन्स समूहाच्या वार्षिक बैठकील आज सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. या बैठकीत जिओ-२ ची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपची सुविधा नव्हती. जिओ फोन-२ मध्ये आडवी स्क्रिन असेल. मात्र जिओ फोन-२ लॉन्च केल्यावरही पहिल्या जिओ फोनचं उत्पादन बंद केलं जाणार नाही. मात्र हे दोन्ही फोन बाजारात उपलब्ध असतील.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *