kumar-1

मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने केली शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर

देश

सत्तेवर येताच कर्नाटकातील जदयू-काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ३४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कुमारस्वामी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी पेट्रोलच्या दरात १.१४ रुपये प्रतिलिटर तर डिझेलच्या दरात १.२० रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे. म्हणजे राज्यात पेट्रोलच्या दरात ३० ते ३२ आणि डिझेलच्या दरात १९ ते २० टक्क्याने वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. पहिल्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे कर्ज फेडले असेल त्यांना सरकार प्रोत्साहन भत्ता किंवा २५ हजार रुपये आर्थिक मदत देणार आहे, असं कुमारस्वामी यांनी सांगितलं.
तसेच राज्यातील इंदिरा कँटीनला मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्यात २४७ कँटीन उघडण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या कँटीनसाठी २११ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *