images

आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार: हवामान विभाग

महाराष्ट्र

या आठवड्याच्या सुरुवातीपासून जोर धरलेला पाऊस पूर्ण आठवडा असाच बरसत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. हवामान खात्याचे तज्ज्ञ अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून या आठवड्यात सक्रीय राहणार असून, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसात मुंबईसह कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाच्या सरी बरसल्या. येत्या 24 तासात कोकण गोव्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *