crime

धक्कादायक ! कापलेलं शिर घेऊन आरोपी गावात सैरावैरा पळत सुटला

देश

झारखंडमधील सरायकेला खरसावां जिल्ह्यामध्ये अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी शाळेच्या परिसरात एका 50 वर्षीय शिक्षिकेचं शिर कापून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपी ते कापलेलं शिर घेऊन गावात सैरावैरा पळत सुटला होता. आरोपीला अशा अवस्थेत पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुकरू हेसा असे या शिक्षिकेचे नाव असून त्या विद्यार्थ्यांना फिजिकल ट्रेनिंगबाबत माहिती देत होत्या. त्याचदरम्यान हरी हेंब्राम हा 20 वर्षीय तरुण शाळेत आला. हरीने त्यांच्या मानेवर सुऱ्याने वार केला. हा हल्ला इतका जोरदार होता की हेसा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे शिर जमिनीवर पडले. त्यानंतर हरीने ते शिर उचलले व तो गावात सैरावैरा पळत सुटला.
शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर शाळा प्रशासनाने त्वरित पोलिसांना माहिती दिली. शिर घेऊन हरी गावात पळत असल्याने त्याला शोधण्यासाठी पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागले. अखेर, हरीला अटक करण्यात त्यांना यश आलं आहे. हरीच्या चौकशीदरम्यान पोलिसांना तो मनोरुग्ण असल्याची शक्यता देखील वाटत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *