Sonali-Bendre-644x362

सोनाली बेंद्रे कॅन्सरने त्रस्त

मनोरंजन

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्याबद्दल एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. की सध्या ती कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असून, न्यॉर्कमध्ये ती उपचार घेत आहे. या संदर्भातील ही माहिती स्वतः सोनाली बेंद्रेनेच ट्विटद्वारे दिली आहे. तीने यामध्ये म्हटले आहे की, तिला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. या आजाराबद्दल तिला कसलीही कल्पना माहिती नव्हती.
‘डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी त्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या मार्गातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्यास मी सज्ज आहे. यात गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून मला मिळत असलेल्या प्रेमाची फार मदत होत आहे. कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने मी ही लढाई लढण्यास सज्ज आहे.’

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *