amarnath-yatra

अमरनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळल्याची घटना, पाच भाविकांचा मृत्यू

देश

जम्मू-काश्‍मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे दरड कोसळल्याची घटना घडली. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघं गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान बचाव पथक वेळीच पोचले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. अमरनाथ यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही 27 जूनला सुरू झाली. देशातील तब्बल 2 लाख भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत.जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जागोजागी रस्ते खचले आहेत. तर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने अमरनाथ यात्रेचा मार्गच यात वाहून गेले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी यात्रेकरू अडकले आहेत.
अमरनाथला जाण्यासाठी यात्रेकरुंचा एक ताफा बलाटल मार्गे रवाना झाला. मात्र, अतिवृष्टी झाल्याने या भाविकांना 28 जूनला बलाटल बेस कॅम्पलाच लष्कराकडून थांबवण्यात आले होते. याच परिसरात पाऊस थोडा कमी झाल्यावर अमरनाथच्या दिशेने निघालेल्या यात्रेकरुंच्या ताफ्यावर काल दरड कोसळली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *