suide

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

कोकण

रायगड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडल्याचे वृत्त आहे. अलिबाग तालुक्यातील आक्षी गावात एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींनी शीतपेयातून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, विषप्राशन केलेल्या सर्वांवर अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती गंभीर असून, डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. मात्र, एकाच वेळी कुटुंबातील सर्वांनी विषप्राशन करण्याचे कारण काय ? याचे कारण मात्र समजू शकले नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *