DhKOuM7VMAAl9BX

लोकलसेवा पूर्ववत होण्यास मध्यरात्र होणार

मुंबई

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन जलदगती मार्गावरील लोकलसेवा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन स्लो मार्गाची सेवा मध्यरात्रीपर्यंत पूर्ववत होईल अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ट्विटरद्वारे पश्चिम रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *