2be463e029f0d3546b335830dc704c48

तब्बल सात तासांनी अंधेरीतून पहिली लोकल रवाना

मुंबई

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनवरचा पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी या स्टेशनमधून पहिली लोकल रवाना झाली. रेल्वे प्रशासनाकडून हार्बर मार्गावर ही पहिली लोकल रवाना करण्यात आली आहे. परंतु, पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक मात्र अजूनही ठप्पच आहे. ही वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अंधेरीत ओव्हरहेड वायर जोडण्याचं काम अद्यापही सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनःस्ताप सहन करावा लागल . दरम्यान, प्रशासनाकडून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *