1c48d121e21c5e07ad3bb4e79920ab70

फक्त एवढया रुपयात मिळणार जिओफाय हॉटस्पॉट

व्यापार

रिलायन्स जिओने मार्च महिन्यात जिओफाय हॉटस्पॉटची सुविधा 999 रुपयांच्या किमतीसह ग्राहकांसाठी उपलब्ध केली होती. या जिओफाय हॉटस्पॉटची किंमत कमी केली गेली आहे. आता अवघ्या 499 रुपयांत ग्राहकांना जिओफाय हॉटस्पॉट खरेदी करता येणार आहे.

जिओफाय हॉटस्पॉट डिव्हाईसवर एक वर्षाची वॉरंटीदेखील देण्यात आली आहे. ग्राहकांना या हॉटस्पॉट डिव्हाईसवर 150 एमबीपीएस डाऊनलोड स्पीड तर 50 एमबीपीएसचे अपलोड स्पीड मिळू शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीने जिओफाय हॉटस्पॉटची किंमत कमी केली असली तरी ही ऑफर मिळण्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. जे ग्राहक जिओचे पोस्टपेड कनेक्शन घेतील आणि नंतर त्याचा वापर जिओफाय डिव्हाईसमध्ये करतील, अशा ग्राहकांनाच या ऑफरचा फायदा मिळू शकेल. जिओ पोस्टपेड ग्राहकांना या ऑफरसोबतच कॅशबॅकही मिळणार आहे. पाठोपाठ 12 बिलिंग सायकल पूर्ण केल्यावर ग्राहकांना 500 रुपये कॅशबॅक मिळेल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *