1515037396_3

धक्कादायक ! नदीत जीप कोसळून ६ भारतीय ठार

देश

नेपाळमध्ये एक जीप नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ६ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना भारताच्या सीमेजवळ नेपाळमधील सुनसरी जिल्ह्यात घडली. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. या अपघातात जीप चालकासह इतर चार लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.जीपमध्ये प्रवास करणारे सर्व भारतीय हे बिहारमधील सुपोल जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
सर्व प्रवासी हे धनकुटा जिल्ह्यातील भेडेटार हिल स्थानकावर परतत होते. नेपाळ पोलिसांनी सांगितले की, अपघातग्रस्त जीपवर भारतीय नंबर प्लेट होती. ही जीप कोसी नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे सध्या नदी ओसंडून वाहत आहे.जीप नदीत कोसळल्यानंतर तीन लोकांचा जागीच तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *