maxresdefault-1

सोशल मीडिया’वरील अफवांवर विश्वास ठेवू नका,पोलिसांचे आवाहन

महाराष्ट्र

सोशल मीडिया वर मुले पळवणारी, चोरी करणारी, किडनी किंवा अवयव काढून घेणारी टोळी फिरत आहे अशा अफवा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे अनोळखी व्यक्तींवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशा प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात मुले पळविल्याची एकही घटना अलिकडच्या काळात कोणत्याही पोलिस ठाण्यात नोंदविलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी व्हाट्स ॲप, फेसबूक, आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत तर काही घटनांत मारहाणीने मृत्यू झाले आहेत. त्यातून जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अशाच अफवेमुळे नुकतेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गावक-यांनी केलेल्या बेदम मारहाणीत 5 मजुरांचा मृत्यू झाला आहे . सोशल मीडियावर अफवा व्हायरल करणा-यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.
सोशल मीडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते.
त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *